Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजशाळेतील शिक्षकांमध्ये वाढली स्पर्धा; शाळेची पटसंख्या टिकवून ठेवण्याचे मोठे आवाहन…

शाळेतील शिक्षकांमध्ये वाढली स्पर्धा; शाळेची पटसंख्या टिकवून ठेवण्याचे मोठे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-राज्यात स्वयंअर्थसहायित तसेच कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांची कॉन्व्हेंट संस्कृतीने भुरळ घातली आहे. मराठी माध्यमाच्या सरकारी व खासगी अनुदानित शाळेला विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे.शाळेची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी नजीकच्या शाळेतील शिक्षकांमध्ये स्पर्धा वाढली आहे.जिल्ह्यातील शाळा १ जुलैपासून सुरू होत असून काही शाळांची विद्यार्थी गणपूर्ती झाली.तर अनेक शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत.कॉन्व्हेंट संस्कृतीपुढे मराठी शाळा टिकतील काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरवर्षी संचमान्यतेनुसार शिक्षकांची संख्या ठरत असून विद्यार्थी कमी झाल्यास शिक्षकांना अतिरिक्त होतात.कुठल्याही शाळेत जाण्यापेक्षा आपल्याच शाळेत नोकरी टिकावी या अपेक्षेने अनेक शिक्षक विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात असतात.आजघडीला मराठी शाळा पेक्षा कॉन्व्हेंट संस्कृतीकडे पालक मोठ्या प्रमाणात वळत आहेत.यामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होत असल्याने पुढे मराठी शाळांचे भवितव्य काय? असा प्रश्न उभा येऊन ठाकला आहे.

राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत २५ टक्के राखीव जागेवर पाल्याला प्रवेश मिळावा म्हणूनही पालकांची धडपड सुरू असते.त्यामुळे दिवसेंदिवस मराठी शाळातील विद्यार्थी संख्या रोडावत चालल्याने शाळांची संख्या घटत आहे.स्वयंअर्थसहायित शिक्षण संस्थांच्या टोलेजंग इमारती,वेगवेगळे गणवेश,सूटबूट आणि टायमधल्या कॉन्व्हेट संस्कृतीकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे वळत आहेत.परिणामी ग्रामीण शाळांत विद्यार्थी संख्या रोडवली असून कशाबशा शाळा चालताहेत; हे वास्तव आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!