Saturday, September 5, 2026
Homeनागपूरशालार्थ पोर्टलवरील माहितीत त्रुट्या आढळल्या अन् बनावट शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भांडाफोड झाला.. -...

शालार्थ पोर्टलवरील माहितीत त्रुट्या आढळल्या अन् बनावट शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भांडाफोड झाला.. – सहा वर्षांपासून मोठा स्कॅम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-जिकडे-तिकडे मिलावटीच्या व भेसळीच्या घटना आपण ऐकलेल्या व वाचलेल्या असेलच,पण गेल्या सहा वर्षांपासून चक्क शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारीच बनावट असतील तर..! किती हास्यास्पद तितकीच गंभीर स्वरूपाची बाब नागपूर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये नुकतीच उघडकीस येऊ लागली आहे.महत्वाचे म्हणजे,सदरचा प्रकार हा शालार्थ पोर्टलवरील माहितीत त्रुट्या आढळल्याने भांडाफोड झाल्याचे वृत्त आहे.हा मोठा स्कॅम सहा वर्षांपासून सुरू असून,अशा बनावट कर्मचाऱ्यांची संख्या ५०० च्यावर असण्याची आणि या फसवणूक प्रकरणात शिक्षण विभागातील वरिष्ठस्तराचे अधिकारी चौकशीच्या ‘रडार’वर असल्याचे सांगण्यात येत आहे.शासनमान्य शाळांच्या कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभागाच्या ‘शालार्थ’ पोर्टलवर ऑनलाइन सादर करावी लागते.त्यानुसार शासनाकडून पगार काढले जातात.नागपूर जिल्ह्यातील काही शाळांच्या  शालार्थ पोर्टलवरील माहितीत त्रुट्या आढळल्या.याची तपासणी केली असता हा सर्व घोटाळा पुढे आल्याचे बोलले जात आहे.२०१९ पासून अशाप्रकारे बनावट नाव व ओळख दाखवत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन भरली जात होती.अधिकाऱ्यांनी काही शाळा संचालकांशी संगनमत करून कर्मचाऱ्यांच्या बनावट आयडीद्वारे शासनाचा निधी उचल केल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात ५८४४ अनुदानित शाळातही हा गोरखधंदा सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सरकारकडून गंभीर पावले उचलली जात असल्याचे बोलले जात आहे.त्यातच यात वरिष्ठ अधिकारीही रडारवर असून ‘ते’ अधिकारी कोण? ‘त्या’ शाळा कोणत्या? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!