उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिस स्टेशन हद्दीतील खेमदेव उर्फ खेमचंद किसन गरपल्लीवार वय-४९ वर्षे रा.तुकडोजीनगर याच्यावर फसवणूक, जीवे मारण्याची धमकी, अश्लील शिविगाळ, तरूण पिढीला व्यसनात ओढणे यासारखे गुन्हे दाखल असून विविध कलमान्वये अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने उपविभागीय दंडाधिकारी गोंडपिपरी यांनी सदर गुन्हेगाराला चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले आहे. खेमदेव गरपल्लीवार हा सन २०२० पासून जिल्ह्यात गुन्हे करीत असून जमीन खरेदी-विक्री संबंधाने फसवणूक करणे, जीवे मारण्याची धमकी देणे,धक्का-बुक्की करून अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, यासारखे गुन्हे करण्याच्या सवयीचा असून त्याविरुध्द गोंडपिपरी पोलिस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तसेच प्रतिबंधात्मक कारवाई सुध्दा करण्यात आली आहे.
जिल्ह्यातून हद्दपार करणे आवश्यक असल्याने त्याबाबतचा योग्य प्रस्ताव तयार करून नियमित पाठ पुरावा करण्यात आल्याने उपविभागीय दंडाधिकारी यांनी खेमदेव गरपल्लीवार यास जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.यापुढे सार्वजनिक शांतता भंग करणारे, हिंसेच्या सवयीच्या गुन्हेगारांविरुध्द सुध्दा अशाच प्रकारची हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक यांनी स्पष्ट केले आहे.