Friday, May 1, 2026
Homeसिरोंचानाल्यातील गढूळ पाण्यावर भागविली जाते तहान -सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पाण्याची समस्या

नाल्यातील गढूळ पाण्यावर भागविली जाते तहान -सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पाण्याची समस्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

सिरोंचा :- तालुक्यातील झिंगानूर चेक नंबर १ झिंगानूर चेक नं.२ येथील नागरिक ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी वणवण करीत असून गावजवळूनच वाहणाऱ्या नाल्यात खड्डा करून पाणी आणून नाल्यातील गढूळ पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर टांगला जात आहे.

गावात पाणी पुरवठा योजने अंतर्गत नळ योजना मंजूर करून बांधकाम करण्यात आले.मात्र दोन वर्षे लोटूनही पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली नसल्याने वारंवार दरवर्षी गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.दरवर्षी  नोव्हेंबर महिन्यापासून विहीरींना व हातपंपना पाणी येत नसल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असते.

शासन स्तरावरून करोडो रुपये खर्च करून नागरिकांसाठी पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात येतात;मात्र प्रत्यक्षात अतिदुर्गम भागत पोहचविल्याच जात नसल्याने वा पोहचविन्यात येतात तर त्यावर अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.पाणी पुरवठा योजना बांधकाम करून दोन वर्षे झाली तरी सुद्धा समस्यांवर तोडगा काढण्यात आला नसल्याने यावर पाणी टंचाईचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी गावातील व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!