Sunday, September 6, 2026
Homeभंडाराविरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू..

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून काही कामानिमित्त शहराकडे निघालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास चप्राड-दिघोरी मार्गावर घडली.महादेव केशव मेश्राम वय ६२ वर्षे,रा.लाखांदूर, जि.भंडारा असे मृत पावलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे नाव आहे.रात्रीच्या सुमारास मेश्राम हे काही कामानिमित्त शिवाजी टी-पॉइंट परिसरातून आपल्या दुचाकीने लाखांदूर शहराकडे निघाले होते. दरम्यान,सोनी-चप्राडकडून दिघोरीकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.यात मेश्राम हे धाडकन खाली कोसळले.खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.नागरिकांनी त्यांना तात्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र,त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!