Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजवाळू उपश्यासाठी ४ हेक्टर; पण कुठून-कुठपर्यंत हेच कळेना..! - नियंत्रण ठेवणाऱ्या...

वाळू उपश्यासाठी ४ हेक्टर; पण कुठून-कुठपर्यंत हेच कळेना..! – नियंत्रण ठेवणाऱ्या जबाबदारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.. – देसाईगंज तालुक्याच्या सावंगी रेती घाटातील प्रकार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातील खनिज उद्योग अधिक कार्यक्षम आणि नियमनबद्ध करण्याच्या दृष्टीने अवैध उत्खनन व वाहतूकीवर आळा घालण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गुरुवार ६ मार्च २०२५ रोजी जिल्ह्यात ६ खनिज डेपो कार्यान्वित केले आहेत.यात गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी,धानोरा तालुक्यातील दुधमाळा,चामोर्शी तालुक्यातील वाघोली,आरमोरी तालुक्यातील देऊळगाव तर देसाईगंज तालुक्यातील सावंगी व कुरुड-कोंढाळा या ठिकाणी वाळू डेपो सुरु करण्यात आले आहेत.या सहा वाळू डेपोच्या विक्री करारावर जिल्हाधिकारी पंडा यांनी एक महिनापूर्वी कार्यभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केली होती.त्यानुसार आता गडचिरोली जिल्ह्यात एकूण सहा डेपो कार्यान्वित आहेत.अशातच काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यावर सोपविली आहे.जिल्ह्यात कोठेही अवैध उत्खनन होऊ नये,यासाठी सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच अवैध उत्खनन अथवा वाहतूक आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,असाही इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. त्यातच गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील सावंगी वैनगंगा नदी घाटात हल्ली अजब-गजब प्रकार उघडकीस आला आहे.वाळू उपश्याचे एकूण क्षेत्र ४ हेक्टर दिलेत,पण कुठून-कुठपर्यंत उपसा होणार आहे; हे सिमांकन पोल न गाळल्याने कळेनासे झाले आहे.वाळू घाटाचा ताबा देण्यापूर्वी या ठिकाणाहून त्या ठिकाणापर्यंत वाळूचा उपसा करावा लागेल,यासाठी रेती घाटात सिमेंटचे पोल गाळणे आवश्यक आहे. मात्र,जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांवर वाळू घाटांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपविली आहे; अश्या अधिकाऱ्यांकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रकार दिसून येतो आहे.देसाईगंज तालुक्याच्या सावंगी रेती घाटातून एकूण क्षेत्रात जवळपास आठ लगतचे सर्व्हे क्रमांक असून त्याची लांबी ३२० व रुंदी १२५ अशी आहे. अशातच वाळू डेपो सुरू करून कितीतरी दिवस होऊन गेलेत.मात्र,सिमांकन पोलचे काय? काही वाळू घाटांवर काळ्या गाळून त्यावर कापडी झेंडा फडकविण्यात आल्याचे दिसून येत आहे.असे झेंडे रेतीचे उत्खनन करणारे केव्हाही इकडे-तिकडे सरकवून अवैध उत्खनन केल्याशिवाय राहणार नाहीत.यात तिळमात्र शंका नाहीच.अशातच सिमांकन पोल बाबत सावंगी साजाचे तलाठी यु.एल.वनकर यांना विचारणा केली असता,त्यांनी संबंधित कंत्राटदार यांना सिमांकन पोल गाळण्याबाबत कळविले असल्याचे सांगितले.यावरून ‘घात गेल्यावर पात’ ठरणार की काय? म्हणजेच ‘तुम कूछ भी करो हम संभालते ना..!’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
(पुढील वृत्त- रेती घाटातील WR म्हणजे काय? ऑनलाईन स्टॉक वेगळाच व प्रत्यक्षात दिसून येणारा वाळूचा स्टॉक भलताच,लाखो रुपयांचा शासनास चुना कसा लावल्या जातो.)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!