Saturday, September 12, 2026
Homeवर्धावाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात 'हाय अलर्ट'..

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.त्यात वाठोडा,धामणगाव,आमला,वाघधरा,बेलगाव, झाडगाव,लोणसावळी,शेकापूर,जोगाधरी आणि वायफड या गावांचा समावेश आहे.या गावांमध्ये वाघाचा सततचा वावर असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही जिकिरीचे झाले आहे.खबरदारीचा उपाय म्हणून वाघाच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र परिसरातील जंगल पिंजून काढत आहेत.अत्याधुनिक यंत्रणेद्वारे आणि प्रत्यक्ष गस्तीव्दारे वाघाच्या प्रत्येक हालचालीवर अत्यंत बारीक लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस शेतात जाणे टाळावे,जंगल परिसरात तसेच शेतात जातांना एकटे जाणे टाळून नेहमी समूहाने जावे,जनावरांच्या गोठ्यांची आणि घरांच्या आसपास विशेष काळजी घ्यावी; असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!