Tuesday, September 22, 2026
Homeचंद्रपूरवाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात असल्याने पुढील काळात काही वस्त्यांमध्ये मानवाचे वास्तव्य कमी आणि वाघोबांचेच राज्य दिसून येणार की काय?असा प्रश्न निर्माण झालेला असतांनाच चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील जनकापूर जंगल परिसरालगतच्या शेतात वाघाने हल्ला चढवून एका शेतकऱ्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.सदरची घटना काल मंगळवारी घडली असून घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रमेश जयराम काशीवार वय ५५ वर्षे,असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.शेतकरी रमेश काशीवार हे दुपारच्या सुमारास जंगल परिसरालगत असलेल्या शेतावर गेले होते. दरम्यान,जंगल परिसरातून आलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.शेतावर गेलेले रमेश काशीवार सायंकाळ होऊनही घरी परतल्याने नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.शोधादरम्यान ते शेतात मृतावस्थेत आढळून आले.यानंतर घटनेची माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली व पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!