Thursday, October 8, 2026
Homeचंद्रपूरवाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.राजेंद्र तिमाजी भोयर वय ५० वर्षे,रा.नवेगाव (पुनर्वसन)असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
राजेंद्र भोयर हे काल सोमवारी ६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास बरडघाट येथील आपल्या चुलत भावाच्या शेतावर कामासाठी गेले होते.सोयाबीन व कापूस पिकांचे वन्यप्राण्यांपासून बचाव व्हावा,यासाठी ते शेताला कुंपण घालत होते.शेताला कुंपण घालत असतांनाच दुपारच्या सुमारास शेतालगतच्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर वनविभाग व पोलिस अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.राजेंद्र भोयर यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले असा परिवार असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!