उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- येथील छगन डेकाटे व मनीषा बांते यांनी मुलीच्या लग्नासाठी गुरुकृपा मंगल कार्यालयाची बुकिंग केली होती.मात्र कोरोना काळात मंगल कार्यालयात लग्न समारंभ करण्यासाठी शासनाने निर्बंध घातले होते.त्यामुळे गुरुकृपा मंगल कार्यालयात लग्न समारंभ न करता घरीच लग्न करण्यात आले. त्यामुळे छगन डेकाटे व मनीषा बांते या दोघांनीही मंगल कार्यालय संचालकाला बुकिंगसाठी दिलेली अनामत रक्कम परत मागितली असता मालकाने बुकिंग रक्कम परत देण्यासाठी नकार दिला.सदर घडलेल्या प्रकारामुळे दोघांनीही भंडारा येथील जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.तक्रारीसोबत शासनाने निर्गमित केलेले निर्बंध आदेश जोडले.दोन्ही तक्रारीची दखल घेऊन ग्राहक आयोगाचे अध्यक्ष भास्कर योगी व सदस्या वृषाली जहागिरदार यांनी मंगल कार्यालय मालकाला आदेश देऊन अग्रीम(ॲडवान्स) रक्कम ९ टक्के व्याजदराने परत करावे आणि दहा हजार रुपये खर्च स्वरूपात तक्रारकत्यांना द्यावे; असे आदेश ग्राहक तक्रार मंचाने दिले आहे.