Sunday, October 25, 2026
Homeगडचिरोलीरेती तस्करांची वाढली मुजोरी...!- तस्करांच्या मुसक्या आवळण्यास प्रशासन 'नापास'

रेती तस्करांची वाढली मुजोरी…!- तस्करांच्या मुसक्या आवळण्यास प्रशासन ‘नापास’

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यात रेती तस्करी नवीन विषय नसला तरी रेती तस्करांच्या वाढत्या मुजोरीसमोर प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीचे भाव गगन चुंबी झाले आहेत.अशातच घरकुल लाभार्थ्यांसह सर्वसामान्यांना रेती पुरवठ्याची झळ सोसावी लागत आहे. 

जिल्ह्यात वैनगंगा नदी नदीपात्रातील रेती उच्च दर्जाची आहे.त्यातही वैनगंगा नदीपात्रातील रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैध उपसा रेती तस्करांकडून केले जात आहे.वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे आहेत.पावसाळ्यात पूर आल्यानंतर संपूर्ण नदीपात्रात पुन्हा एकदा उच्च दर्जाच्या रेतीचा भरणा होत असतो. ही एक नैसर्गिक देणगीच जिल्ह्याला मिळाली आहे. याचाच फायदा जिल्ह्यातील रेती तस्कर घेतांना दिसून येत आहेत.

काही मुजोर रेती तस्करी करणारे धमकीवजा बोलणी करून ‘हमरी-तुमरी’ वर येतांना दिसून येतात. जणूकाही रेती घाट त्यांनीच विकत घेतला की काय?लिलाव प्रक्रिया रखडल्याने चांदीच-चांदी रेती तस्करांची झाली आहे.एखादे वेळेस जेव्हा मोठा फटाका फुटेल त्यावेळेस मुजोरी करणे महागात पडणार आहे.’चोरी तर चोरी वरून शिनाजोरी’ अशी अवस्था हल्ली निदर्शनास येऊ लागली आहे.रेती घाट लिलाव प्रक्रिया जोपर्यंत होणार नाही; तोपर्यंत रेतीच्या चोऱ्या थांबणार नसल्याचे दिसून येते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!