Wednesday, June 24, 2026
Homeचंद्रपूर १४ लाखाची बँक चोरी प्रकरणी दोन आरोपी अटकेत- चंद्रपूर 'स्टेट बँक ऑफ इंडिया'...

 १४ लाखाची बँक चोरी प्रकरणी दोन आरोपी अटकेत- चंद्रपूर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ शाखेतील प्रकरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- शहरालगत घुग्घुस मार्गावरील एमआयडीसी परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत  चोरट्यांनी लॉकर तोडून चाैदा लाख पळविले होते.याप्रकरणात दोन संशियत आरोपीांना पोलिसांनी अटक केली आहे.बँकेला सलग दाेन दिवस सुट्या असल्याच्या कालावधीत चोरीचा प्रकार घडला होता.बॅंक पूर्ववत सुरु झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना लॉकर तोडलेले दिसले. चोरट्यांनी अनेक दिवसांपासून बॅंकेवर पाळत ठेवली होती.त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोड्याची घटना येऊ नये,याची काळजी चोरट्यांनी घेतली होती.

त्यानंतर बँकेच्या इमारतीच्या  खिडक्या तोडून आत प्रवेश केला आणि गॅस कटरने लॉकर तोडले होते. लॉकरमधील काही नोटा जळाल्या होत्या.बॅंकेतील सुरक्षा यंत्रणा सुरुवातील बंद केली असल्याने लॉकर  गॅस कटरने कापले गेले व चौदा लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले.सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज संग्रहीत यंत्रणाही स्वतःसोबत घेऊन गेले.अखेर चार दिवसानंतर दोन आरोपींना पोलिसांनी शोधून काढले आहे. हे दाेघे चंद्रपूर शहरातीलच असल्याची माहिती आहे.बॅंक फोडी प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.बॅंक परिसराच्या मार्गावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. तेव्हा घटना घडल्यानंतर एक संशयास्पद वाहन या मार्गाने रात्री गेल्याचे समोर आले.चारचाकी वाहनाच्या समोरच्या काचेवर एक वाक्य लिहीले होते. हेच वाक्य पोलिसांना आरोपीपर्यंत घेवून गेले.सदर वाहनाचा पोलिसांनी शोध घेतला आणि पहिला आरोपी हाती लागला.त्यानंतर दुसऱ्याला अटक केली.दोन्ही अटकेतील आरोपी चुलत भाऊ आहेत.रक्कम मोठी असल्याने पोलीस सावधानतेने सर्व आरोपींचा शोध घेत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!