Monday, May 25, 2026
Homeअहमदनगरचक्क तहसीलदाराने ठोसली दारू अन् गेला शासकीय रुग्णालयात.....- रुग्ण व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन....

चक्क तहसीलदाराने ठोसली दारू अन् गेला शासकीय रुग्णालयात…..- रुग्ण व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

अहमदनगर :-जिल्ह्यातील कोपरगाव येथील तहसिलदाराने शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबर व उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णांबरोबर गैरवर्तन केले.मद्य धुंद अवस्थेत  ग्रामीण रुग्णालयात गेले होते.त्यांचा कुठलाही नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल नव्हता.त्यांनी केलेले हे गैरवर्तन अत्यंत चुकीची आहे. त्यांच्या पदाला न शोभणारे हे वर्तन असून,जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असून,सोमवार पर्यंत त्यांना अटक न झाल्यास अहमदनगर जिल्ह्यासह सर्व ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुरेखा आंधळे यांनी दिला.कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबर गैरवर्तन केले.कोपरगाव येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे साडेपाच वाजता ते आले होते.त्यांनी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांची गैरवर्तन केले.तसेच जातीवाचक शिवीगाळही केली.त्याचबरोबर कामावर हजर असलेल्या शिपायाला रुग्णालयाबाहेर काढले. मद्यसेवन करून त्यांनी हे गैरवर्तन केले.याप्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदारांनी केलेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी व परिचारिका निदर्शने करत तहसीलदारांच्या अटकेची मागणी केली.आंदोलनात महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटना,वैद्यकीय अधिकारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना,मध्यवर्ती कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!