उद्रेक न्युज वृत्त
कोरपना ता.प्र./नितेश केराम
कोरपना(चंद्रपूर) :- कोरपना तालुक्यातील मौजा- लखमापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ अंतर्गत स्थानिक आमदार विकास निधीतून गावातील भोईसमाजासाठी सभागृह बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर सभागृह बांधकाम १५ लक्ष रुपयांचे असून भोईसमाजासाठी व इतर सार्वजनिक हितासाठी उपयोगात येणार आहे.सभागृह बांधकाम प्रसंगी वाल्मिकी महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.सदर कार्यक्रम प्रसंगी आमदार धोटे यांनी म्हटले की,लखमापूर गावच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहु; वाल्मिकी मस्यपालात सहकारी संस्था भोईसमाज बांधव यांनी पारंपरिक व्यवसाय सोबत जोड धंदा करण्यावर भर दिला पाहिजे आणि वाल्मिकी महाराज यांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन उत्तम शिक्षणाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे; असे आमदार धोटे यांनी म्हटले आहे.