उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज शहराच्या हनुमान वार्ड येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्य प्रबोधणात्मक कार्यक्रमात बोलताना इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांनी म्हटले की, राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगितेत सांगितल्या प्रमाणे आज ग्रामगिता ही ग्रामास अर्पण केली आहे.जगाचा पोशिंदा खेढ्यात राहतो; जनतेला लागणारे अन्न तो पुरवितो मात्र आज पुरती व्यवस्था ही त्याच्या पीकवलेल्या मालाला भाव ठरविण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही; त्यामुळे तो आज काळानुसार हतबल झालेला आहे.मात्र त्याने जर ठरविले तर आज शहरी भागात जी अर्थव्यवस्था आहे; जी बळकट आहे; म्हणतो त्याला छेद देण्याचे काम बळीराजा करू शकतो,त्यामुळे आज ग्रामगितेचे वाचन करून तेथील विचार आत्मसात करून त्याप्रकारे ते आचरणात आणले तरच देश तारू शकेल तसेच राष्ट्रसंतांचे विचारच देशाला तारक ठरणार असल्याचे त्यांनी प्रतिपादीत केले.आजचा तरुण मोबाईल वापरतो; ही प्रगती आहे.मात्र त्याचा दुरुपयोग वेगळ्या मार्गाने केला तर आजची तरुणाई ही भरकटल्या शिवाय राहणार नाही.त्यामुळे ग्रामगितीचे वाचन करा व पण विचार अंगीकारा तेच विचार देशाला तारक ठरणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्य प्रबोधणात्मक कार्यक्रमा प्रसंगी गुरुदेव सेवा मंडळ येथील गुरुदेव भक्तॲड.प्रकाश भैय्या,रामकृष्ण सहारे,विनोद फुलबांडे,प्रदीप दोनाडकर ,गुरुदेव सेविका वाघाडे,पांडुरंग बुराडे,विष्णू नागमोती, पुरुषोत्तम भागडकर,प्रशांत पिंजरकर प्रा.काशिनाथ मातेरे, सुरेश नरहरशेट्टीवार,शालू दंडवते,शांता दिघोरे यांनी संपूर्ण संचासहीत त शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक व गुरुदेव भक्त उपस्थित होते.

