Wednesday, May 27, 2026
Homeभंडारारिव्हॉल्वर व चार काडतुसांसह चौघांना अटक- भंडारा शहरातील घटना... 

रिव्हॉल्वर व चार काडतुसांसह चौघांना अटक- भंडारा शहरातील घटना… 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- सरत्या वर्षात स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रिव्हॉल्वर व चार काडतुसांसह चौघांना अटक केली आहे.ही धाडसी कारवाई काल, मंगळवारला दुपारी भंडारा शहरातील शीतला माता मंदिराजवळ करण्यात आली.यात दोन जण फरार असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले. तुमसर येथे २५ सप्टेंबरला नईम शेख यांची हत्या करण्यात आली होती. काल अटक केलेल्या आरोपींचा या हत्याकांडाशी कनेक्शन आहे काय? याचाही शोध घेण्यात येत आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांना काही अज्ञात गुंड प्रवृत्तीचे इसम भंडारा शहरात आल्याची माहिती मिळाली.उल्लेखनीय म्हणजे काल,मंगळवारी दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पकडण्यात आलेले चारही इसम हे तुमसर येथील रहिवासी होते.भरगच्च वस्तीतून जात असताना घडलेल्या कारवाईने खळबळ उडाली.वर्षभरात खुनाच्या तब्बल २५ घटना व खुनाच्या प्रयत्नाच्या घटनांतही वाढ झाल्याचे दिसून आले.सरते वर्ष संपायला चार दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच रिव्हॉल्वरसह चार जिवंत काडतुसे चौघांच्या ताब्यातून जप्त करण्यात आली.सर्व चारही व्यक्ती तुमसर येथील रहिवासी आहेत.एखादी मोठी घटना घडविण्यासाठी तर भंडारा शहरात आले नव्हते ना..! याचाही तपास पोलिस करीत आहेत.या कारवाईदरम्यान फरार असलेल्या दोन इसमांचा शोध घेतला जात आहे.पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर असल्याचे कळते.

लोहित मतानी,पोलिस अधीक्षक,भंडारा 👇

स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिस यांच्या संयुक्त पथकाने चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक रिव्हॉल्वर व चार काडतुसे जप्त केली. फरार आरोपींच्या शोधात पथक पाठविण्यात आले आहे. या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!