Saturday, June 13, 2026
Homeमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांची गोळी घालून हत्या..

राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांची गोळी घालून हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच आज,शनिवार १२ ऑक्टोंबरच्या रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे घटना घडली.गोळीबारानंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.SRA प्रकल्पातून हा गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.दरम्यान या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालया बाहेर फटाके फोडत असताना तिघांनी बाबा सिद्दिकींवर गोळीबार केला.या तिघांनी बाबा सिद्दिकींवर ६ राऊंड गोळ्या झाडल्या,त्यापैकी एक गोळी त्यांच्या छातीला लागली होती.या घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र,तेथे त्यांचा मृत्यू झाला.या घटनेचे वृत्त कळताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली. बाबा सिद्दीकी निर्मल नगर येथील एका जाहीर कार्यक्रमासाठी गेले होते.त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी झाली.त्याआडून हा गोळीबार झाला.तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार होत असताना त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी होते. यादरम्यान त्यांच्या सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!