Saturday, June 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता 'या' युवकांना मिळणार पीएम इंटर्नशिप योजने अंतर्गत ५ हजार महिन्याचे.. -...

आता ‘या’ युवकांना मिळणार पीएम इंटर्नशिप योजने अंतर्गत ५ हजार महिन्याचे.. – आजपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पीएम इंटर्नशिप योजना २०२४ साठी नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच १२ ऑक्टोंबरपासून सुरू झाली आहे.नोंदणी लिंक आज सायंकाळी ५ वाजतापासून सक्रिय झाली आहे; उमेदवार अधिकृत वेबसाइट pminternship.mca.gov.in वर जाऊन इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करू शकतात.ही योजना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सुरू केली आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोंबर २०२४ असून योजनेअंतर्गत इंटर्नशिप करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी २५ ऑक्टोंबरपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
हायस्कूल,उच्च माध्यमिक शाळा उत्तीर्ण विद्यार्थी या इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करू शकतात.याशिवाय ITI पास,पॉलिटेक्निक डिप्लोमा धारक,BA,B.Sc., B.Com,BCA,BBA आणि BPharm मधून पदवी घेतलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात, परंतु पोस्ट ग्रॅज्युएट, IIT पदवीधर, NIT, IIM,राष्ट्रीय लॉ युनिव्हर्सिटी पदवीधर,एमबीए,सीएस,सीए, एमबीबीएस आणि बीडीएस पदवी असलेल्या उमेदवारांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावी.
पीएम इंटर्नशिप योजना २०२४ साठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा,त्याचप्रमाणे  पूर्णवेळ नोकरीत नसावेत किंवा पूर्णवेळ शिक्षणात गुंतलेले नसावेत.ऑनलाइन/डिस्टन्स लर्निंगद्वारे अभ्यास करणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
योजनेअंतर्गत,उमेदवार १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप करू शकतील.पाच वर्षांत एक कोटी उमेदवारांना टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे.इंटर्नशिप कालावधीत उमेदवारांना दरमहा ५ हजार रुपये मानधन म्हणून दिले जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!