Saturday, April 18, 2026
Homeमुंबईहोमगार्ड बंधूंना दसऱ्याची मोठी भेट.. आता राज्यातील होमगार्ड यांचे मानधन दुप्पट

होमगार्ड बंधूंना दसऱ्याची मोठी भेट.. आता राज्यातील होमगार्ड यांचे मानधन दुप्पट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-होमगार्ड बंधू रात्रंदिवस कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करीत असतात.अशातच राज्यातील होमगार्ड यांना अल्प असे मानधन दिले जात असल्याने यासंदर्भात काहींनी आवाज देखील उठवला होता.हीच बाब लक्षात घेता काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने होमगार्ड यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता.आज,शनिवार १२ ऑक्टोंबर रोजी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
राज्यातील ५५ हजार होमगार्ड बंधूंना सरकारने
दसऱ्याची मोठी भेट दिली आहे.होमगार्ड यांचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.हे मानधन देशात सर्वाधिक असल्याचेही फडणवीसांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे.याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे.
ही भत्तेवाढ दिनांक-१ ऑक्टोंबर,२०२४ पासून लागू करण्यात येणार आहे.सदरहू सुधारित भत्ते लागू करण्यासाठी सन २०२४-२५ या वर्षाकरिता रु.५५२.७१२० कोटी इतकी अतिरिक्त रक्कम मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यानंतर दरवर्षी रुपये ७९५.७१२० कोटी रकमेची तरतूद करण्यास मान्यता देखील दिली गेली आहे.
राज्यातील होमगार्ड यांचे मानधन प्रतिदिन ५७० रुपयांवरून १०८३ रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे.याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे.उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरून २५० रुपये इतका करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!