Friday, April 17, 2026
Homeभंडारारात्री-अपरात्री फोन करून अश्लील संभाषण.. - मुख्याध्यापकाविरोधात शिक्षक,पालक संतप्त..

रात्री-अपरात्री फोन करून अश्लील संभाषण.. – मुख्याध्यापकाविरोधात शिक्षक,पालक संतप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-प्रभारी मुख्याध्यापक म्हणून शाळेत कार्यरत असतांना शिक्षिका आणि महिला पालकांना रात्री-अपरात्री फोन करून अश्लील संभाषण केल्या प्रकरणी महिला पालकांकडून तक्रारी होताच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील समर्थ प्राथमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक मनोजकुमार कावळे यांना मुख्याध्यापक पदावरून काढून सहाय्यक शिक्षक पदी ठेवले होते.मात्र, प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी नियमबाह्य पद्धतीने कावळे यांना पुन्हा मुख्याध्यापक पदी नियुक्ती केल्याचा आरोप करीत या निर्णयाविरोधात संस्थाचालकासह १३ शिक्षकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
मनोज कुमार कावळे यांनी १ ऑगस्ट २०२० ते ३० एप्रिल २०२३ या काळात प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम केले होते.या काळात त्यांनी शिक्षिका आणि महिला पालकांना रात्री-अपरात्री फोन करून अश्लील संभाषण केल्याचे आरोप आहेत.शिक्षक आणि पालकांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक)जिल्हा परिषद भंडारा यांना वारंवार तक्रारी केल्या होत्या.परंतु शिक्षणाधिकारी यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.शिक्षक आणि पालकांनी मुख्याध्यापकाच्या नियुक्तीविरोधात जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांना निवेदन दिले आहे.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष करून मनोज कावळे यांची नियमबाह्य पद्धतीने पुन्हा मुख्याध्यापकपदी नियुक्ती केली.महिला पालकांनी संस्थाचालकांकडे मुख्याध्यापक कावळे यांनी मानसिक त्रास तसेच रात्री बेरात्री मॅसेज करून फोन करून अश्लील संभाषण केल्याची तक्रारही केली होती.
मनोजकुमार कावळे,प्रभारी मुख्याध्यापक,समर्थ प्राथमिक विद्यालय,लाखनी👇
माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आणि चुकीचे आहेत.मी मुख्याध्यापक असतांना मला अशा कोणत्याही प्रकारचे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले नव्हते.मी पुन्हा मुख्याध्यापक पदावर नियुक्त होणार म्हणून माझ्याविरोधात हा सर्व बनवा बनवीचा डाव रचण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

भोंदूबाबाच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे उघड होताच अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.विधीच्या नावाने अनेक उच्चभ्रू महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातला ताब्यात...

सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर ओळख; बोलणे बंद करताच अश्लील फोटो व व्हिडीओ क्लिप केले व्हायरल.. – आरोपी तरुणास बेड्या..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २६ वर्षीय तरुणाची सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर १९ वर्षीय तरुणीशी ओळख झाली.दोघांचेही स्नॅपचॅटवर चॅटिंग सुरू झाले. चॅटिंगदरम्यान तरुण हा आपल्या नातेसंबंधातीलच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!