Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरराजकीय पक्षांची नोंदणी रद्द झालेल्यात आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्याही पक्षाचा समावेश..!

राजकीय पक्षांची नोंदणी रद्द झालेल्यात आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्याही पक्षाचा समावेश..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नुकतेच भारत निवडणूक आयोगाने देशातील एकूण ३३४ राजकीय पक्षांवर मोठी कारवाई करत त्यांची नोंदणी रद्द केली आहे.रद्द करण्यात आलेल्या राजकीय पक्षांतील ३३४ मध्ये महाराष्ट्र राज्यातील ९ राजकीय पक्षांचा समावेश आहे.९ मध्ये युवाशक्ती संघटना, नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी,पिपल्स गार्डियन,दि लोक पार्टी ऑफ इंडिया,नव भारत डेमोक्रॅटिक पार्टी,अवामी विकास पार्टी,बहुजन रयत पार्टी,भारतीय संग्राम परिषद आणि इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया यांचा समावेश इत्यादींचा समावेश आहे.अश्यातच चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या युवाशक्ती संघटनेचाही समावेश आहे.भांगडिया यांनी २६ जानेवारी २०११ मध्ये युवाशक्ती संघटना स्थापन केली होती.स्थापनेनंतर काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका युवाशक्ती संघटनेने लढवत चिमूर तालुक्यात जिल्हा परिषद,पंचायत समितीत काँग्रेसच्या गडाला हादरे देत चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यांतील राजकारणात आपली छाप पाडली होती.२०१२ च्या स्थानिक निवडणुकांमध्ये युवाशक्ती संघटनेने जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांमध्ये उडी घेत चिमूर तालुक्यातून चार जिल्हा परिषद सदस्य व नागभीड तालुक्यातून एक सदस्य निवडून आणून जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम सभापतीपद मिळविले होते.कीर्तिकुमार भांगडिया यांनी युवाशक्ती संघटनेची सुरुवात करतांना सर्वप्रथम चिमूर तालुक्यातील युवकांना एकत्र केले होते.त्यानंतर चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला होता.युवाशक्ती संघटनेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रात आमदारकी साठी ही त्या कालावधीत उमेदवार उभा करण्यात आला होता.हे विशेष.अश्यातच आता युवाशक्ती संघटना पक्षाची भारत निवडणूक आयोगाने नोंदणी रद्द केल्याने विविध चर्चांना वाचा फुटली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!