उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- कित्तेक स्थानिक स्वराज्य संस्था,पंचायत समिती,जिल्हा परिषद व इतर ठिकाणी नव्याने निवडून आलेले काहीजण मोठ्या मानाच्या पदावर विराजमान होतात.विराजमान होऊन त्यांचा कार्यकाल संपण्याच्या मार्गावर येऊन ठेपला जातो तरी सुद्धा त्यांना कळतच नाही की,आपले अधिकार, कर्तव्ये व आपला पदाचा पॉवर काय आहे? अशातच काहीजणांची पत्नी पदाधिकारी असते तर पती कारभारी असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी महिला वर्गांकडे चूल आणि मूल म्हणून बघितले जायचे.घरचीच कामे करून बाहेर ठिकाणी पडणे व निर्णय घेण्यावर अंकुश लावले जायचे.मात्र सध्याच्या घडीला काळानुरूप परिस्थिती बदलत चालली आहे. मात्र अशातही स्वतःचे निर्णय घेण्यास महिला वर्गांच्या निर्णयात काहीजण बाध्य ठरित आहेत.ते म्हणजे काही जणांचे पती परमेश्वर.पतीच सर्व कारभार सांभाळीत असल्याने महिला सक्षमीकरणाचा प्रश्न ऐरवी निर्माण झाला आहे.काही ठिकाणी कुणाचाही हस्तक्षेप जरी नसला तरी पदावर कार्यरत असतांना जवळपास पाच वर्षे निघून जातात; नंतर त्यांना शेवट-शेवट कळतेय की,मी आता माजी पदाधिकारी झालोय.
गावचा वा नगरचा विकास केवळ नाली बांधकाम,रस्ते बांधकाम करण्याने होत नसून ही खिसे गरम करण्याची पॉलिसी आहे.कित्तेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य,सार्वजनिक शौचालये कुचकामी, नागरिकांची प्रश्ने,पाण्यासाठी भटकंती व इतर अनेक प्रश्न ऐरणीवर टांगले जातात.मात्र याकडे लक्ष न देता आपलीच पोळी शेकण्याची कामे केली जातात.हल्ली पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून स्त्रिया जरी चालत असल्या तरी त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर ‘बिन पगारी फुल्ल अधिकारी’ बाध्य ठरीत आहेत.त्यामुळे स्त्रिया वर्गांनी आपल्या पदाचा योग्य वापर करून घेऊन आपले अधिकार,कर्तव्ये व इतर बाबींचा अभ्यास करून ‘वज्रमूठ’ बांधून घेणे गरजेचे आहे.