Tuesday, September 22, 2026
Homeनवी दिल्लीमोठी बातमी; देशाच्या राजधानीतील ८० शाळा बॉम्बने उडविण्याची धमकी…

मोठी बातमी; देशाच्या राजधानीतील ८० शाळा बॉम्बने उडविण्याची धमकी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

दिल्ली :- दिल्ली-एनसीआरमध्ये आजची सकाळ झाली तीच खळबळजनक बातमीने.देशाची राजधानी असलेल्या दिल्लीबरोबरच नोएडा आणि गुरुग्राममधल्या जवळपास ८० शाळांना धमकीचा ईमेल आला.शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या ईमेलमधून देण्यात आली होती.ई-मेल मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.दिल्ली पोलिसांनी तात्काळ सर्व शाळांमध्ये सर्च ऑपरेशन राबवले.डॉग आणि बॉम्ब स्क्वॉडच्या मदतीने प्रत्येक शाळेतील प्रत्येक वर्गात बारकाईने तपास करण्यात आला.या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. 

हा मेल कोणी पाठवला आणि त्यामागे नेमका काय उद्देश होता; याबाबत पोलीस आता शोध घेत आहेत. हा ई-मेल कोणत्या आयडीवरुन पाठवण्यात आला आहे हे शोधण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे.सुरुवातीच्या तपासानंतर धमकीचा ई-मेल देशाबाहेरून केला गेल्या असल्याचे उघड झाले.

दिल्ली पोलिसांच्या तपासात सर्व शाळांना धमकीचा एकसारखाच ई-मेल पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे.धमकीच्या ई-मेलमध्ये सर्वात शेवटी RU असे लिहिण्यात आले आहे.RU हे अक्षर रशियाच्या दिशेने इशारा करणारा आहे.पण सर्व ई-मेल रशियातूनच पाठवले गेले आहेत,याबाबत अंतिम निष्कर्ष निघालेला नाही.कदाचित आरोपींनी हा कट भारतात बसूनही रचला गेला असावा; असा पोलिसांना संशय आहे.

ज्या आयपी ॲड्रेसवरुन सर्व शाळांना धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे; तो आयपी ॲड्रेस ट्रेस करण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.आयपी ॲड्रेसचा शोध लागल्यास आरोपींना पकडणे सोपे होणार आहे.यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलबरोबरच सायबर पथकही याचा कसून शोध घेत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!