उद्रेक न्युज वृत्त
बल्लारपूर (चंद्रपूर):- बल्लारपूर शहरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.शहरातील एका नऊ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना रविवारी (दि. २१) उघडकीस आली.या प्रकरणी २२ वर्षीय विकृत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार नऊ वर्षीय मुलगा कुटुंबासह शहरातील एका वॉर्डात राहतो.आठ दिवसापूर्वी त्याच्या घराजवळ राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने घराजवळील झुडपात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले.रविवारी त्या बालकाची आई पाणी भरीत असताना तिने घराजवळील लहान मुलांचे कुजबुज ऐकले.तिने घरी येऊन आपल्या मुलास विचारले असता त्याने २२ वर्षीय तरुणाने अनैसर्गिक कृत्य केल्याचे सांगितले.आई ने लगेच ही बाब त्याच्या वडिलांना सांगितली आणि त्या मुलाचे आई-वडील तसेच परिसरातील महिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.पोलिसांनी कारवाई करत २२ वर्षीय तरुणाला अटक केली.त्याच्यावर भादंवि कलम ३७७,३६३,५०६, पोस्को ४,८ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलिस करीत आहे.

