Tuesday, September 8, 2026
Homeबल्लारशाहअखेर "टी ८६ एम" वाघाला जेरबंद करण्यात  बल्लारशाह वनविभागाला आले यश….-चार जणांचा...

अखेर “टी ८६ एम” वाघाला जेरबंद करण्यात  बल्लारशाह वनविभागाला आले यश….-चार जणांचा घेतला होता बळी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बल्लारपूर (चंद्रपूर):- बल्लारशाह वन परिक्षेत्रातील कारवा जंगल परिसरात वाघाने मागील तीन महिन्यात चार जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे नागरिकांत वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. या घटनांमुळे नागरिकांमध्ये सुद्धा वन विभागाप्रति रोष निर्माण झाला होता. वाघाला जेरबंद करण्यासाठी कारवा बल्लारपूर जंगलात ट्रॅप कॅमेरे लावले होते. मानवी रक्ताला चटावलेल्या या टी ८६ एम नर वाघाला जेरबंद करण्यात अखेर बल्लारशाह वनविभागाला सोमवारी दिनांक -२९ रात्रीच्या सुमारास यश आले आहे.

सदर ची कारवाई बल्लारशाह वन विभागाच्या पथकाने फत्ते केली.बल्लारशाह वन विभागात नर वाघाने तीन महिन्यापासून कारवा-बल्लारपूर जंगलात चांगलाच धुमाकूळ घातला होता.या वाघाने आजतगायत चार जणांचा बळी घेऊन वन विभागाला जेरीश आणले होते. यामुळे या वाघाला पकडण्यासाठी बल्लारशाह प्रादेशिक वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावून मोहीम सुरू केली होती. यासाठी वनविभागाचे कर्माचारी रात्रदिवस गस्त करत होते.गस्ती दरम्यान सोमवारी सायंकाळी टी-८६-एम वाघ कारवा बल्लारपूर जंगलात ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आला.यावेळी अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव उपचार केंद्राचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार यांच्या मार्गदर्शनात शुटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला बंदुकीचा नेम साधून इंजक्शनद्वारे बेशुद्ध केले. बेशुद्ध वाघाची वैद्यकिय तपासणी करून जेरबंद करण्यात आले. सदर वाघ हा 10 वर्षाचा असून पिंजऱ्यात पकडून वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.ही कारवाई मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचा मार्गदर्शनात सहायक वैनसंरक्षक आदेशकुमार शेडगे यांच्या नेतृत्वात बल्लारशाहचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे,क्षेत्र सहायक के.एन.घुगलोत, ए.एस.पठाण,पी.व्ही. रामटेके, एस.एम.बोकडे, आर.एस.दुर्योधन, डी.बी.मेश्राम,ए.बी.चौधरी,एस.आर.देशमुख, बी.एम.वनकर, पी.एच.आनकडे,टी.ओ.कांबळे आदींच्या पथकाने केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!