Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनारायणपूर आणि कांकेर सीमेवर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने १० नक्षलवाद्यांचा केला खात्मा….

नारायणपूर आणि कांकेर सीमेवर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने १० नक्षलवाद्यांचा केला खात्मा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -


उद्रेक न्युज वृत्त :- छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नारायणपूर आणि कांकेर सीमेवर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांने १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.यापैकी ३ महिलांसह एकूण १० नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एके-४७ शस्त्रास्त्रांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि इतर वस्तूही जप्त केल्या आहेत.या चकमकीमध्ये अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

नारायणपूर-कांकेर सीमा भागातील अबुझमद येथे मंगळवारी सकाळपासून डीआरजी आणि एसटीएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांची शोध मोहीमही सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड आणि महाराष्ट्र सीमेवरील तकामेटा भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी उपस्थित असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री उशिरा शोध मोहीम राबवली.

आज,मंगळवारी सकाळी जवान त्या भागात पोहोचले असता त्यांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही नक्षलवाद्यांवर गोळीबार केला.या चकमकीमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये ३ महिला नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे.या महिन्याच्या सुरुवातीला कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी आतापर्यंत नारायणपूर आणि कांकेरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर प्रदेशात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत ८८ नक्षलवादी ठार झाले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!