उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विविध कामे हातात घेण्यात आली.मात्र मागील चार महिन्यांपासून कामावरील मजुरांना मजुरी मिळाली नसल्याने अनेक सण अंधारात गेले होते.मात्र उशिरा का होईना ..! अखेर रोजगार हमी योजनेच्या मजुरांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.त्यानुसार प्रशासनाच्या वतीने रोजगार हमीच्या कामावरील मजुरांची थकीत असलेली ३० कोटींहून अधिकची मजुरीची रक्कम डीबिटीद्वारे मजुरांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

