Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीरोजगार हमी योजनेचे काम हवे तर बँकेत ई- केवायसी करणे आवश्यक…

रोजगार हमी योजनेचे काम हवे तर बँकेत ई- केवायसी करणे आवश्यक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- शासनाने रोजगार हमी योजनेच्या कामासाठी बँकेत संबंधित मजुराच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असणे आवश्यक केले आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेचे काम हवे असल्यास मजुरांना बँकेत पुन्हा ई- केवायसी करणे आवश्यक आहे.तेव्हाच संबंधित मजुरांना काम मिळेल अन्यथा त्यांना कामापासून मुकावे लागले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश मजुरांची ई-केवायसी झाली नसल्याचे रोहयो यंत्रणेद्वारे रोजगार सेवकामार्फत गावागावागत कळविण्यात आले आहे. यापूर्वी याच मजुरांना त्याच बँक खात्यावर पैसेसुद्धा जमा व्हायचे.आता काही मजुरांचे आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी मिसमॅच दाखवित असल्याने त्यांना पुन्हा ई-केवायसी करावी लागेल.ज्या मजुरांची ही समस्या असेल अशांना आता बँकेत जाऊन ई-केवायसी करावी लागणार आहे.अनेक ग्रामपंचायत स्तरावर ई-केवायसी न केलेल्या मजुरांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.त्यामुळे मजुरांनी तत्काळ ई-केवायसी करणे आवश्यक आहे; अन्यथा त्यांना कामापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!