उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून विधानसभेतील शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्यात आलं आहे. आता संसदेतील शिवसेनेचं पक्ष कार्यालय सुद्धा शिंदे गटाच्या ताब्यात गेले आहे.
संसदेच्या भवनात शिवसेना पक्षाला जे कार्यालय मिळाले आहे. ते शिंदे गटाकडे देण्यात यावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यांची ही मागणी लगेच मान्य करण्यात आली आहे. आता संसदेतील कार्यालय हे शिंदे गटाला मिळाले आहे.
त्यामुळे या कार्यालयात संजय राऊत,अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांना प्रवेश मिळण्याची शक्यता नाही.जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हे तिन्ही नेते मानत असतील तर त्यांना कार्यालयात प्रवेश दिला जाईल अशी भूमिका संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी घेतली आहे.

