- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात दाखल झाले आहेत.तत्पूर्वी त्यांच्या समर्थकांनी रोड शो केला.यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या रोड शो मध्ये पोलिसांनी कलम १४४ लागू करून अनेक आप कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
सिसोदिया म्हणाले की,मी आज पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. संपूर्ण तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचे प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावे लागले. तरी मला पर्वा नाही. ते भगतसिंग यांचे अनुयायी आहेत. देशासाठी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली. अशा खोट्या आरोपांमुळे तुरूगांत जाणे ही खूप छोटी गोष्ट आहे.
- Advertisement -