Tuesday, April 21, 2026
Homeचंद्रपूरमुले चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३ लाख ५० हजारात मुलाची विक्री.. - रेल्वे...

मुले चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३ लाख ५० हजारात मुलाची विक्री.. – रेल्वे स्टेशनवरून साडेतीन वर्षाच्या बालकाचे केले होते अपहरण; पाच महिला आरोपी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर येथील रेल्वे स्टेशन परिसरातून साडेतीन वर्षाच्या बालकाचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.विशेष म्हणजे,मुलाच्या आईला मध्यरात्री जाग आली तेव्हा मुलगा शेजारीच झोपलेला होता.अश्यातच वडिलांना पहाटे जाग येताच मुलगा गायब झाल्याने एकच खळबळ माजली होती.प्रकरणी राजन कुंजाम रा.केसरी टोला, ता.अंबागड चौकी,जि.राजनांदगाव, छत्तीसगड यांनी काल शनिवारी सकाळी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.लागलीच चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची सात विशेष पथके तयार केली. शंभर पेक्षा अधिकची सीसीटिव्ही फुटेज तपासून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले.फुटेजची तपासणी करीत असतांना  काही संशयास्पद हालचाली दिसल्या.दरम्यान, एका चारचाकीने मुलाला घेऊन तेलंगणा राज्यात गेल्याचे निष्पन्न होताच पथके तेलंगणा राज्यात रवाना करून अवघ्या वीस तासांत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.आज,रविवार १ मार्च रोजी पाच महिला आरोपींना तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथून अटक करण्यात आली आहे; तर यातील दोन पुरुष आरोपी अद्याप फरार आहेत.आरोपींमध्ये लावण्या कुमारस्वामी कोणा वय ३४ वर्षे,सातक्का चंद्रया करेरे वय ५० वर्षे रा.मंथनी,मंचेरियल,तेलंगणा व राणी पसनोटी वय ३० वर्षे,संगीता पानंगणती वय ४० वर्षे आणि ऐलक्का बुद्दे वय ६० वर्षे,सर्व राहणार मंचेरियल,तेलंगणा असे अटकेतील आरोपी महिलांची नावे असून अन्य दोन जणांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. मुलगा सुरक्षित असून आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आला आहे.प्रकरणी आरोपी महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मुलाला ३ लाख ५० हजार रुपयांना विकण्याचा सौदा करण्यात आल्याचे सांगितले आहे. तेलंगणातील ऐलक्का बुद्दे,राणी पसनोटी,संगीता पानंगणती या महिलांनी दोन पुरुष साथीदारांसह बल्लारपूर रेल्वेस्थानकावर असलेल्या त्या मुलाच्या आई-वडिलांवर पाळत ठेवली होती.मध्यरात्री ते गाढ झोपेत असतांना संधी साधून त्या मुलाचे अपहरण करून मंचेरियल गाठले.तिथे सातक्का करेरे आणि लावण्या कोणा या महिलांना ३ लाख ५० हजार रुपयांत विक्री केली.घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे,परीविक्षाधिन सहाय्यक पोलिस अधीक्षक गौरव कायंदेपाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, बल्लारपूरचे ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांकेडवार,बलराम झाडोकार,पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांनी केली.
  • झोपेत असतांना चिमुकल्याला नेले चोरून👇
राजन कुंजाम हे पत्नी,साडेतीन वर्षाचा मुलगा व ५ महिन्यांच्या मुलीसह मागील आठ महिन्यांपासून बल्लारपूर रेल्वे परिसरातील गणपती शेडमध्ये वास्तव्यास होते.ते यापूर्वी रेल्वे बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते.मात्र,सध्या काम बंद झाल्याने रेल्वे स्टेशन परिसरात प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विक्री करून उदरनिर्वाह करत आहेत.राजन कुंजाम यांची पत्नी रात्री सुमारे २ वाजता जागी झाली,तेव्हा मुलगा त्यांच्या जवळ झोपलेला होता.मात्र,पहाटे चार वाजता कुंजाम जागे झाले असता,मुलगा शेजारी नसल्याचा दिसून आला. परिसरात शोधाशोध केली; मात्र मुलाचा कुठेही थांगपत्ता लागला नसल्याने राजन कुंजाम यांनी बल्लारपूर पोलिसात तक्रार दाखल केली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खेडेगावच्या जंगलात जुगाराचा डाव; अड्ड्यावर पोलीसांची धाड.. – तब्बल २२ आरोपींना अटक करून ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील खेडेगावच्या जंगलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री ते आज मंगळवारी पहाटेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन कुरखेडा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!