उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- नगरपरिषद देसाईगंजतर्फे आरमोरी मार्गे नायरा पेट्रोल पंपा पासून ते कुरुड बसस्थानका पर्यंतची रस्त्यालगत लावलेली हायमास्ट लाईट गेली अनेक दिवांपासून काही बंद स्थितीत तर काही लाईटे रात्रोच्या सुमारास लीपलाप करीत असूनही देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे.
देसाईगंज ते आरमोरी मार्गे रात्रोच्या सुमारास सुसाट वाहने रस्त्यावरून धावली जातात.जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ देसाईगंज असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कामासाठी तालुका मुख्यालयी जात असतात.दिवसभर काम करून सायकलस्वार, दुचाकीस्वार व इतर सायंकाळी व रात्रोच्या सुमारास गावाकडे परत जात असतांना काही वाहन धारक वाहनाचे अप्पर-डीप्पर देत नसल्याने समोरील वाहनाच्या लाईटचा प्रकाश डोळ्यांवर येत असल्याने येणारे समोरील वाहन कोणते व मुख्य रस्त्यावरून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.रात्रीच्या वेळेस सगळीकडे अंधारामुळे ये-जा करणाऱ्या नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.अशातच रस्त्याच्या कडेला असलेले काही हायमास्ट लाईट बंद तर काही लीपलाप करीत असल्याने देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता सदर मार्गावरील हायमास्ट लाईट दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.