उद्रेक न्युज वृत्त :-आज राज्यचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प मांडले. यामध्ये महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे.यातलीच एक योजना ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण.’ या योजनेतून राज्य सरकार महिलांना आर्थिक मदत करणार आहे.अर्थसंकल्पात योजनेची घोषणा केल्यानंतर आता याचा शासन निर्णय ही जाहीर करण्यात आला आहे.
योजनेचे स्वरुप👇
पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल.तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.
राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा,घटस्फोटित,परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता👇
१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
२) राज्यातील विवाहित,विधवा,घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
३) किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे👇
१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
२) लाभार्थ्याचे आधार कार्ड.
३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).
५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
७) रेशनकार्ड.
८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.