उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- शहरातील रहिवासी असलेले भूषण पालटकर वय ५० वर्षे हे काही दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रस्त झाले होते.अशातच आज १९ मार्च रोजी भंडारा शहरालगत असलेल्या कारधा पुलावरून आजाराच्या त्रासापायी वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
भूषण यांनी आपल्या जवळील सायकल व जोडे काढून ठेवत पुलावरून सरळ नदीत उडी घेतली. जवळच असलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात येताच भूषण यांना दोरीच्या सहायाने वाचविण्याचा प्रयत्न केला.परंतु नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांना यश न आल्याने अखेर भूषण यांचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती भंडारा पोलीस विभागास देण्यात आल्याने घटनास्थी पोलीस प्रशासनाने धाव घेतली.पाण्यातील शव बाहेर काढून शविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.पुढील तपास भंडारा पोलीस प्रशासन करीत आहेत.