उद्रेक न्युज वृत्त
नितेश केराम/ कोरपना ता.प्र.
चंद्रपूर(कोरपना):- भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने भाजपा स्थापना दिन बस स्थानक परिसर मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडोळे सेवानिवृत्त मुख्यध्यपक तर उदघाटक नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना होते.प्रमुख पाहुणे म्हणून पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,कवडू पा.जरीले तालुका उपाध्यक्ष,रमेश पा. मालेकार जेष्ठ नेते,अमोल पा.आसेकर माजी नगर सेवक,शशिकांत आडकिने उपसरपंच,जगदीश पिंपळकर शाखा अध्यक्ष,विजय पा.पानघाटे,सुभाष हरबडे नगर सेवक,तिरुपती किनाके,नामदेव पा.झाडे, दिनेश डेगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायण हिवरकर यांनी भारत मातेचे व थोरपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यापर्ण केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा पडोळे सेवानिवृत्त मुख्यद्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले तसेच भाजपा जेष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते कृष्णा पडोळे सेवावृत मुख्यद्यापक, कवडू पा.जरीले उपाध्यक्ष, नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष,शशिकांत आडकिने उपसरपंच,नामदेव झाडे आदींचा शाल,श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
नारायण हीवरकर यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की,भारतीय जनता पार्टीची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी स्थापना झाली.याचे संस्थापक स्व.माजी पंतप्रधान अटल बीहारी वाजपेयी व श्रीकृष्ण अडवाणी होते.आज कोरपना येथे ४३ वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत.हे आमचे सौभाग्य मानतो.भाजपा पक्ष हा चांगली विचारधारा ठेवून राष्ट्रहीताचे कार्य करीत आहोत.येणाऱ्या काळात देशाला उच्च स्थानावर नेण्यास यात त्रीमला शंका नाही.असे म्हटले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.