Saturday, September 5, 2026
Homeनागपूरभाजीचा ठेला लावण्यावरून वाद; भर बाजारात गोळीबार.. - एक ठार तर एकाच्या...

भाजीचा ठेला लावण्यावरून वाद; भर बाजारात गोळीबार.. – एक ठार तर एकाच्या मानेला गोळी चाटून गेली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-भाजीचा ठेला लावण्यावरून उफाळलेल्या वादातून भर बाजारात गोळीबार झाल्याची घटना काल,गुरुवारी रात्री ९.४५ वाजेच्या दरम्यान नागपूर शहराच्या मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनीमधील प्रकाशनगर परिसरात गोविंद लॉनजवळ
घडली.झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एकाच्या मानेला चाटून गोळी गेल्याने जखमी झाला.प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.सोहेल खान वय ३५ वर्षे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे तर भाजी विकत घेण्यासाठी गेलेल्या मो.सुलतान ऊर्फ मो.शफी याच्या मानेला चाटून गोळी गेल्याने जखमी झाला.घटनास्थळावर एक जिवंत काडतूसदेखील आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली व पळापळ झाली.
माहितीनुसार,काल रात्रीच्या सुमारास साडे नऊ ते पावणे दहा वाजे प्रकाशनगर परिसरात गोविंद लॉन जवळील बाजारात चार आरोपी गाडीने आले व त्यांनी तेथील ठेल्यांजवळ गाडी थांबविली.तेथील तरुणांना शाहरुख कुठे आहे,असे विचारत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली.एकाने देशी पिस्तूल काढत गोळीबारच सुरू केला.त्यातील एक गोळी सोहेल खानला लागली. मानकापूर पोलिस ठाण्याच्या पथकाला याची माहिती देण्यात आली.पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले व सोहेलला मेयो इस्पितळात नेले.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.त्यातच भाजी विकत घेण्यासाठी गेलेल्या मो.सुलतान ऊर्फ मो.शफी याच्या मानेला चाटून गोळी गेल्याने जखमी झाला.पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेतले होते.दरम्यान,या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.काही संतप्त तरुणांनी घोषणाबाजी करत काही दुचाकींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. भाजीचा ठेला लावण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!