उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी :- शाहिद भगतसिंग यांच्यात कोणत्याही राजकीय पक्षा बद्दल संकुचितपणा,अलगतावाद व इतरांबद्दल तुच्छता दृष्टी आपल्याला आढळत नाही.इतर सर्वांच्या योगदानाबद्दल त्यांना योग्य भान व आदर असल्याचे दिसते.ज्या काळात जे मुद्दे व राजकारणात पुढे आणले,त्या सर्वांना समजून घेण्याची व भिडण्याची क्षमता भगतसिंगांच्या विविध लेखांमधून व भूमिकांमधून स्पष्टपणे समोर येते.
एका क्रांतिकारी भूमिकेतून सर्व प्रवाहातील योग्य मुद्द्यांना स्पर्श करून भारतीय जनतेची व्यापक एकजूट घडवण्याची बीजरुपातील क्षमता आणि एक समान बिंदू बनण्याची शक्यता भगतसिंगांच्या रुपात आजही चमकुन गेलेली दिसते.शहिद भगतसिंग स्मारक समिती आरमोरी यांचे वतीने आयोजित शहिद भगतसिंग,सुखदेव,राजगुरू यांच्या ९२ व्या शाहिद दिनी दि.२३ मार्च २०२३ रोज गुरुवार ला सकाळी १० वाजता घेण्यात आलेल्या शहिद भगतसिंग चौकातील कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून डाॅ.महेश कोपूलवार मार्गदर्शनपर भाषणात बोलतांना आपले विचार मांडतांना ते बोलत होते.
शहिद भगतसिंग स्मारक समिती आरमोरी यांचे वतीने आयोजित शहिद भगतसिंग,सुखदेव, राजगुरू, यांच्या शाहिद दिनी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात निमित्ताने भगतसिंग सुखदेव राजगुरू या़ंच्या फोटोंना माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले.स्वातंत्र्याच्या वेदीवर आपली आहूती देऊन आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या हुतात्मा प्रती अभिवादन करण्यात आले.यावेळी भगतसिंग स्मारक समिती अध्यक्ष प्रफुल्ल ठवकर, डॉ.प्रदिप खोब्रागडे,नगरसेवक मिलिंद खोब्रागडे,ॲड.जगदिश मेश्राम, मिनाक्षीताई सेलोकर, संतोषसिंग जुनी,चुन्नीलाल मोटघरे ,सुनिल नंदनवार इत्यादी मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना काॅ.डाॅ.कोपूलवार म्हणाले भारतीय समाजाची वैशिष्ट्यपुर्ण गुंतागुंत,वासाहतिक अवस्थेमुळे निर्माण होणारे पेच आणि सामाजिक -राजकीय क्षेत्रातील सर्वोच्च प्रवाहामध्ये त्यातून येणाऱ्या विसंगती वा निर्माण होणारे अंतर्विरोध,यांचे प्रतिबिंब भगतसिंग व सहकाऱ्यांच्या राजकीय कार्यातही दिसून येते.विचार शास्त्रीय समाजवादी, पण प्रत्यक्षात कार्य राष्ट्रवादी चळवळीत करायचे.,ते समाजवादी विचार आणि राष्ट्रीय मुक्ती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा लागतो.असे विचार मांडले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुञसंचालन व आभारप्रदर्शन चुन्नीलाल मोटघरे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स़ंतोषसिंग जुनी, बालू खोब्रागडे, संजय वाकडे,ऋषी रामटेके,प्रकाश खोब्रागडे,रामहरी वाटगूरे इत्यादींनी परिश्रम घेतले.