Sunday, September 6, 2026
Homeआरमोरीब्रम्हपुरी तालुक्यातील तरुणाचा आरमोरी शहरात अपघात; एकजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी..

ब्रम्हपुरी तालुक्यातील तरुणाचा आरमोरी शहरात अपघात; एकजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-ब्रम्हपुरी तालुक्याच्या आवळगाव येथील ३० वर्षीय तरुणाचा त्यांच्या
दुचाकीला टिप्परने मागून जबर धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला,तर सोबत असलेले दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना काल,सोमवार २७ ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान आरमोरी शहराच्या बर्डी टी-पॉइंट जवळील आरमोरी-गडचिरोली मार्गावर घडली.अपघातात सारंग रवींद्र शेंडे वय ३० वर्षे, रा.आवळगाव,ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर महेंद्र सुखराम जांगधुर्वे वय ३२ वर्षे व डेव्हिड नवलू मडावी वय ३५ वर्षे हे दोघेही गंभीर जखमी झाले असून ते गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील येरकड गावातील रहिवासी आहेत.अपघात घडताच नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व आरमोरी पोलिसांना माहिती दिली.अपघातातील डेव्हीड मडावीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेच्या दिवशी तिघेही त्यांच्या एमएच ३३ एजे २७३५ क्रमांकाच्या दुचाकीने आरमोरी शहरातील विवाह सोहळा आटोपून काही कामानिमित्त सारंग शेंडेच्या गावाकडे जाऊन परत आरमोरीकडे येत असतांना शहराच्या बर्डी टी-पॉइंट जवळील आरमोरी-गडचिरोली मार्गावर एमएच ४० सीटी ११५५ क्रमांकाच्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.दुचाकीला धडक बसताच तिघेही  दुचाकीवरून मुख्य मार्गावर दूरवर फेकल्या गेले. यात सारंगच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटना घडताच टिप्पर चालक वाहनासह फरार झाला.प्रकरणी आरमोरी पोलिसांनी फरार चालकावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!