Saturday, June 27, 2026
Homeभंडाराबोलेरो कार आणि ट्रकचा भीषण अपघात; अपघातात पाच पैकी चार जणांचा घटनास्थळीच...

बोलेरो कार आणि ट्रकचा भीषण अपघात; अपघातात पाच पैकी चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-भंडाराच्या राष्ट्रीय महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेलसमोर काल,रविवारच्या रात्री बोलेरो कार आणि ट्रकचा भीषण अपघात घडला असून अपघातात पाच पैकी चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.गंभीर जखमी इसमावर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.अशोक फुलचंद देहरवाल वय ४८ वर्षे,रा.नागपूर,शैलेंद्र लेखाराम बघेल वय ३४ वर्षे,खापरी,नागपूर,शैलेश पन्नालाल गोकुळपुरे वय ४० वर्षे,एअरफोर्स नगर,मुकेश बिंजेवार वय ३२ वर्षे,वाडी,नागपूर अशी मृतांची नावे आहेत.तर गंभीर जखमींमध्ये अविनाश नाकतोडे याचा समावेश आहे.
माहितीनुसार,रायपूरहून आलेले बोलेरो कार वाहन हे नागपूरकडे जात होते.अशातच भंडारा महामार्गावरील
बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये पाचजण जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असतांना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले.यात चौघांचा जागीच मृत्यू झाला.तर चालक नाकतोडे गंभीर जखमी झाला.अपघातानंतर महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली.घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीने भंडारा जिल्हा रूग्णालयात दाखल केले,तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!