Saturday, September 12, 2026
Homeभंडाराबापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. कारवाईत जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ९९ लाख ७८ हजार रुपये इतकी असून अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ३५ लाख रुपये किंमतीचा टाटा ट्रक, असा एकूण १ कोटी ३४ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.प्रकरणी ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पंकजकुमार भूषण यादव वय ३० वर्षे,रा.छपरा, बिहार आणि बापी बादल मलिक वय ३८ वर्षे, रा.नवाग्राम,पश्चिम बंगाल अशी आरोपींची नावे असून दोन्ही आरोपींविरोधात साकोली पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक-६०६/२०२६ अन्वये कलम ८(क), २०(ब)(ii)(क)एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकोली पोलिसांना आज,सोमवार २७ जुलैच्या पहाटे ओडिशा राज्यातून गांजाने भरलेला टाटा कंपनीचा डब्लूबी २३ एफ ८७८५ क्रमांकाचा ट्रक रायपूर-राजनांदगाव-देवरी-साकोली या राष्ट्रीय महामार्गे नागपूरकडे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे,वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साकोली तालुक्यातील सेंदूरवाफा टोलनाक्यावर पहाटे सापळा रचण्यात आला.पहाटे सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान संशयित ट्रक अडवून त्याची पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली.तपासणी दरम्यान ट्रकमध्ये लपवून ठेवलेला १९९.५६० किलो गांजा आढळून आला.जप्त केलेल्या गांजाची किंमत ९९ लाख ७८ हजार इतकी असून ट्रकची किंमत ३५ लाख अशा प्रकारे एकूण १ कोटी ३४ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.विशेष म्हणजे,यापूर्वीही साकोली पोलिसांनी मुंबई नार्कोटिक्स विभागाच्या सहकार्याने सेंदूरवाफा टोलनाक्यावर मोठी कारवाई करून तब्बल २४५ किलो गांजा जप्त केला होता. त्याहीवेळेस ओडिशाहून नागपूरकडे निघालेल्या आयशर ट्रकमधील कॅरेटच्या खाली ठेवलेला अंमली पदार्थ पोलिसांनी शोधून काढला होता.त्याही प्रकरणात चालक व क्लीनरला ताब्यात घेण्यात आले होते.आज करण्यात आलेली कारवाई भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे आणि साकोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकोली पोलीस ठाण्याचे एपीआय जितेंद्र राऊत,पीएसआय किशोर मानकर, अर्जुन बेडवाल,स्वप्नील गोस्वामी,नरेंद्र झलके,सचिन राऊत, टेकचंद बुरडे,गोविंद शिंदे,धनविजय गणवीर यांच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!