- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच तालुक्यांमध्ये काही महिन्यांपासून हिंस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे.शेतावर जाणाऱ्या नागरिकांसह मार्गावरून आवागमन करणाऱ्या नागरिकांनाही हिंस्त्र प्राण्यांनी भक्ष्यस्थानी प्राधान्यक्रम दिल्याचे हल्ली सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांनी शेती करणे सोडावे काय? असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला आहे.अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तेलंगणा-महाराष्ट्र राज्य सीमेवर असलेल्या आदिवासी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुरा तालुक्यातील बगूलवाई येथे एक हृदयाला हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.कापूस वेचण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढवून ठार तर केले; मात्र,शेतकऱ्याची विचारपूस करणारा कुणीही वालीच नसल्याने सदरची घटना दोन दिवसांनी उघडकीस आली आहे.
घटनेची महिती अशी की,राजुरा तालुक्यातील शेतकरी जंगू मारू आत्राम वय ५३ वर्षे हे बुधवार १८ डिसेंबरला कापूस वेचण्यासाठी सकाळी सातच्या सुमारास आपल्या शेतात गेले.शेतात कापूस वेचत असतांना अचानक तिथेच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला.यात जंगू आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला.जंगू आत्राम यांची पत्नी ही मागील दीड वर्षापूर्वी आजाराने मरण पावली.त्यामुळे एकुलता एक मुलगा होता. परंतु,तोसुद्धा दिव्यांग आहे.त्यामुळे त्याला कुणाचा आधार मिळाला नाही.ही घटना उघडकीसदेखील आली नाही.मृताची बहीण काल,शुक्रवारी २१ डिसेंबरला शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेली असता,तिला जंगू आत्राम यांचा मृतदेह दिसला.त्या ठिकाणी रक्त सांडलेले दिसले.वाघाचे केस व पगमार्कही आढळून आले. त्यामुळे घटनेची माहिती परिविक्षाधीन उपविभागीय वनअधिकारी पी.एन.अवधूतवार यांना देण्यात आल्याने ते वन कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.सदर घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
- Advertisement -

