उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वडसा येथील दीक्षाभूमी येथे ६ डिसेंबर २०२३ रोजी फॅन ऑफ आंबेडकराईट मोमेन्ट तर्फे राबवण्यात आलेल्या “एक वही एक पेन” या उपक्रमास सुरुवात केली होती.सनोज खोब्रागडे, प्रतीक लाडे,तुषार रहाटे,मोहितेश शिंपोलकर,रोहित जनबंधू,विक्की राऊत,मयंक मेश्राम आणि सुमेध मेश्राम यांनी हे उपक्रम राबविले होते.या उपक्रमातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना जमा झालेले वही आणि पेन सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त ३ जानेवारी आणि १२ जानेवारी ला वाटप करण्यात येणार होते. ते काल दिनांक १२ जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कोरची तालुक्यातील काही शाळा आणि वसतिगृहांमधे वाटप करण्यात आले.
मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह,मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह,कोरची आणि आश्रम शाळा कोरची मधील वर्ग पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.येथे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बी.पी.कुळसंगे सर तसेच इतर शिक्षक नीलमचंद कपागते,एस.डी.पचारे,अंबोने,वाडघुरे मॅडम, अचारे ठाकरे उपस्थित होते.

