Thursday, October 15, 2026
Homeचंद्रपूर रेती तस्करांना गुंगारा देऊन तहसीलदारांनी केली मोठी कारवाई-१६ लाखाच्या वर दंड केला...

 रेती तस्करांना गुंगारा देऊन तहसीलदारांनी केली मोठी कारवाई-१६ लाखाच्या वर दंड केला प्रस्तावित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक धडक कारवाई कोरपनाचे तहसीलदार रणजित यादव यांनी केली. यात चार हायवा,पाच ट्रॅक्टर याचा समावेश आहे.चार हायवा कडून एकूण १० लाख ६२ हजार तर पाच ट्रॅक्टरकडून एकूण ५ लाख ७८ हजार असा १६ लाख ४० हजारांचा दंड प्रस्तावित करून आकारण्यात आला.यामध्ये जी आर एन्फ्रा कंपनीचे दोन हायवा हे नियमबाह्यरीत्या रात्री मुरुमाची वाहतूक करताना तर इतर दोन हायवा व ट्रॅक्टर हे वाहन रेतीची वाहतूक करताना पकडले. ही कारवाई कोडशी,गडचांदूर येथे करण्यात आली.कोडशी येथील कारवाई ही मोठ्या शिताफिने करण्यात आली.ही कारवाई तहसीलदारांनी तस्करांना चांगलाच गुंगारा देत नियमित मार्ग व वाहन बदलून गनिमी रीतीने पकडली.या कारवाईमुळे अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. परीविक्षाधीन आयएएस तहसिलदार रणजित यादव यांनी त्यांच्या नियुक्ती नंतर अवघ्या पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत ही धडक कारवाई करून तस्करीवर चांगलाच आळा बसवला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!