उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- कोणत्याही क्षेत्रातील काम असो सर्वांची कामावरील ही नियोजित ठरलेली टक्केवारी असतेच.मात्र याला काहीजण अपवाद सुद्धा आहेत.आपण नेहमी म्हणतो की शासकीय वा इतर कामे झकास ऐवजी भकास कां बरं होतात; याचे मुख्य कारण म्हणजे खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत सगळ्यांची टक्केवारी ठरलेली आहे.कुणी ५% घेतो,कुणी १०% घेतो, कुणी १५% तर कुणी किती टक्के घेईल याचा नेम नाही.काहींच्या मते,कामे आणण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असते.त्याही ठिकाणी टक्का हा पक्का वापरला जातोच.अन्यथा दाम नाही तर काम नाही.
कामे आणल्यानंतर आयत्या बिळात नागोबा असणारे बिळातून डोके वर काढून पाहू लागतात.त्यांनाही टक्का हा पक्का होण्यासाठी द्यावाच लागतो.या सर्व प्रकारा नंतर ‘चलती का नाम गाडी’ हे करावेच लागते.मात्र गाडी यावरच कुठे थांबते; काम करतांना इकडून-तिकडून भटकंती करून येणारे हा बरोबर नाही; तो बरोबर नाही; असे करीत असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे करावेच लागत असल्याने याला एकच उपाय ‘खिसा गरम तर पडला नरम’ इथपासून तर थेट टॉकीज पर्यंत चित्रपट चालवायचा असल्याने अभिनेते,खलनायक,नायिका यांना हातात हात घालून चालावेच लागत असल्याने झकास कामाची प्रचिती येत असते.
या सर्व प्रकारांवरून काम झकास ऐवजी भकास तर होणारच; असे म्हणणे वावगे ठरणार नाही.