Saturday, May 2, 2026
Homeदेसाईगंजप्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीतील घरकुले क्रमानुसार न देता मर्जीतील लोकांना... - एकलपूर...

प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीतील घरकुले क्रमानुसार न देता मर्जीतील लोकांना… – एकलपूर ग्रामपंचायतीचा प्रताप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल योजनेचा लाभ दिला जाणाऱ्या  पात्र लाभार्थ्यांना डावलून प्रतीक्षा यादीतील मर्जीच्या लोकांना देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप देसाईगंज तालुक्याच्या एकलपूर येथील संजय दादाजी नाकतोडे यांनी केला आहे.नाकतोडे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये फेरफार केल्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.याबाबत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान सह मुख्य कार्यकारी अधिकारी,आमदार मसराम,संवर्ग गट विकास अधिकारी देसाईगंज यांना नुकतीच तक्रार दाखल केली आहे.
देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायत एकलपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेची यादी सन २०१०-११ च्या जनगनेनुसार तयार करण्यात आली.त्यानुसार ग्रामसभा घेऊन गावातील गरजू व्यक्तींना सर्वप्रथम घरकुलाचे लाभ देण्याचे ठरले व त्यानुसार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र,सध्याच्या घडीला प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीतील घरकुले क्रमानुसार न देता आपल्या जवळच्या व्यक्तींना सर्वप्रथम लाभ देण्यात येत असल्याचा आरोप एकलपूर येथील ग्रामस्थ संजय नाकतोडे यांनी केला आहे.त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करून गरजू व्यक्तींना लाभ देण्याची मागणी त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!