Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरपोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय दोन मुलांचा बुडून मृत्यू..

पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय दोन मुलांचा बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-तालुक्याच्या लाव्हा शिवार परिसरात खदाणीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.धीरज उर्फ छोटू सुधाकर नारनवरे वय १५ वर्षे व नैतिक विपीन वानखेडे वय १५ वर्षे अशी मृतकांची नावे असून दोघेही म्हाडा कॉलनी,गणेशनगर येथील रहिवासी आहेत.काल गुरुवारी दुपारी १२ वाजता वाडी परिसरातील पाच मित्र पोहण्यासाठी लाव्हा शिवारातील खदानीच्या पाण्यात गेले होते.तीन मित्र खदानीच्या काठावर बसलेले असतांना धीरज आणि नैतिक पाण्यात उतरले.पोहतांना धीरजचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडू लागला.त्याला वाचविण्याचा प्रयत्न नैतिकने केला,मात्र दोघेही खोल पाण्यात बुडाले.घटनास्थळी उपस्थित एका स्थानिक नागरिकाने धीरजला वाचविण्याचा प्रयत्न केला,पण तोपर्यंत उशीर झाला होता.सुमारे दीड वाजता घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.यावेळी एका इसमाच्या मदतीने धीरज याचा मृतदेह बाहेर काढून एमआयडीसी परिसरातील अमेरिकन ऑन्कॉलॉजी रुग्णालयात पाठविण्यात आला.नैतिकचा मृतदेह मात्र पाण्यात खोल गेला होता.वाडी अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला.खदानीत यापूर्वीही अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती,ज्यात दोन युवकांचा मृत्यू झाला होता.अश्यातच पुन्हा जीवघेणी घटना घडल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!