Tuesday, September 1, 2026
Homeभंडाराअल्पवयीन मुलीशी डॉक्टरचे सोनोग्राफी कक्षात गैरवर्तन.. - गुन्हा दाखल; डॉक्टर फरार..

अल्पवयीन मुलीशी डॉक्टरचे सोनोग्राफी कक्षात गैरवर्तन.. – गुन्हा दाखल; डॉक्टर फरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने प्रकरणास वाचा फुटली.प्रकरणी ४५ वर्षीय
आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल रा.साकोली(शहर) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ६४(२)(१),६५(१) तसेच पोस्को(POSCO) कायदा व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सध्या डॉक्टर फरार असून,साकोली पोलिसांकडून शोध सुरू आहे.घटनेमुळे साकोली शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 पीडित अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी आपल्या आईसोबत साकोली येथील एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. डॉक्टरांनी सोनोग्राफी आवश्यक असल्याचे सांगत, मुलीच्या आईला व नर्सला बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर सोनोग्राफी कक्षात कथित स्वरूपाचे गैरवर्तन झाल्याचा आरोप आहे.सोनोग्राफीनंतर रुग्णालयाच्या बाहेर आल्यानंतर पीडित मुलीने आपल्या आईला झालेल्या प्रकाराची माहिती दिली.त्यानंतर घरी परतल्यावर मुलीने  घडलेला प्रकार वडिलांनाही
सांगितला. डॉक्टर इतक्यावरच थांबला नाही तर मुलीला संपर्क क्रमांक मागितला व याबाबत कोणालाही सांगू नये,असेही बजावले.तसेच यापूर्वीही इंस्टाग्रामवरून संबंधित डॉक्टरकडून पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट आल्याचा दावा करण्यात आला आहे.तक्रार होताच डॉक्टरने पलायन केले.साकोली पोलीस प्रशासन त्याच्या मागावर असून लवकरच अटक केली जाईल,असे साकोली पोलिसांचे म्हणणे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!