Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरपोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय दोन मुलांचा बुडून मृत्यू..

पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय दोन मुलांचा बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-तालुक्याच्या लाव्हा शिवार परिसरात खदाणीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.धीरज उर्फ छोटू सुधाकर नारनवरे वय १५ वर्षे व नैतिक विपीन वानखेडे वय १५ वर्षे अशी मृतकांची नावे असून दोघेही म्हाडा कॉलनी,गणेशनगर येथील रहिवासी होते.काल गुरुवारी दुपारी १२ वाजता वाडी परिसरातील पाच मित्र पोहण्यासाठी लाव्हा शिवारातील खदानीच्या पाण्यात गेले होते.तीन मित्र खदानीच्या काठावर बसलेले असतांना धीरज आणि नैतिक पाण्यात उतरले.पोहतांना धीरजचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडू लागला.त्याला वाचविण्याचा प्रयत्न नैतिकने केला,मात्र दोघेही खोल पाण्यात बुडाले.घटनास्थळी उपस्थित एका स्थानिक नागरिकाने धीरजला वाचविण्याचा प्रयत्न केला,पण तोपर्यंत उशीर झाला होता.सुमारे दीड वाजता घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.यावेळी एका इसमाच्या मदतीने धीरज याचा मृतदेह बाहेर काढून एमआयडीसी परिसरातील अमेरिकन ऑन्कॉलॉजी रुग्णालयात पाठविण्यात आला.नैतिकचा मृतदेह मात्र पाण्यात खोल गेला होता.वाडी अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला.खदानीत यापूर्वीही अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती,ज्यात दोन युवकांचा मृत्यू झाला होता.अश्यातच पुन्हा जीवघेणी घटना घडल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!