Sunday, July 12, 2026
Homeचंद्रपूरपोलीस शिपायाने घरातच घेतला गळफास- चंद्रपूर शहरातील घटना

पोलीस शिपायाने घरातच घेतला गळफास- चंद्रपूर शहरातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- शहरातील घुटकाळा प्रभागातील रहिवासी पोलिस शिपायाने ४३ वर्षीय सुशील कुंभलवार यांनी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याने सदर घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सुशिल कुंभलवार हे गडचिरोली पोलिस दलात कर्मचारी होते.जिल्हा बदलीनंतर ते चंद्रपुरात दाखल झाले.५ वर्ष चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते.२ वर्षांपूर्वी त्यांची राजुरा पोलिस ठाण्यात बदली झाली होती.याच दरम्यान त्यांची प्रकृती बीघडली.

त्यांच्यावर आठ महिने उपचार सु रू होते.अलिकडेच ते ५ महिन्यांपूर्वी सेवेत कार्यरत झाले.दरम्यान काल शुक्रवार सकाळी घरी कुणीही नसताना त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृताचा पंचनामा करून शासकीय रुग्णालयात शव पाठविले. पुढील तपास पोलिस करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!