Tuesday, July 21, 2026
Homeनागपूरपार्टी करणे जीवावर बेतले; तलावात बुडून दोघांचा मृत्यू...

पार्टी करणे जीवावर बेतले; तलावात बुडून दोघांचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सात जणांपैकी दोघांना तलावाजवळ पार्टी करणे महागात पडले असल्याची घटना काल,रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.काल रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी नागपूर येथील ७ युवक पार्टी करायला पारशिवनी तालुक्यातील भागीमहारी येथील पाटबंधारे विभागाच्या तलावावर गेले होते. सात युवकांपैकी एक युवक आंघोळीकरिता पाण्यात उतरला असता खोल पाण्यात बुडू लागला.त्यातच
त्याला वाचवायला गेलेला युवकदेखील पाण्यात बुडाला.सदरची घटना काल रविवारी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली.रोहित हिरालाल पाल वय ३७ वर्षे,रा.छिंदवाडा,हल्ली मुक्काम मानेवाडा चौक,नागपूर असे मृताचे नाव आहे तर मनोज मोतीराम गायकवाड वय ४० वर्षे,रा.मानेवाडा,नागपूर याचा शोध सुरु आहे.दोघेही रेल्वेमध्ये खासगी नोकरी करीत होते.रोहित व मनोज हे त्यांचे मित्र संदीप अहिरे,अभिषेक यादव,विकास रॉय,शिवकुमार समुद्रे,नीलेश टेंभुर्णे व इंदर यादव पाच मित्रांसोबत पार्टी करायला काल रविवारी दुपारी भागीमहारी गावापासून जवळ असलेल्या पाटबंधारे विभागाच्या बांधराझरी तलावावर गेले होते.काही वेळ फिरल्यानंतर यातील ५ जणांनी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली.दुपारी ३ वाजताच्या दरम्यान रोहित व मनोज आंघोळीकरिता तलावातील पाण्याजवळ गेले.अशातच मनोज पाण्यात उत्तरला.तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो गटांगळ्या खाऊ लागला.त्याला वाचविण्याकरिता रोहित पाण्यात उतरला.पाणी खोल असल्यामुळे दोघेही बुडाले.याबाबत माहिती कळताच पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले.त्यांनी एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी बोलावले.तत्पूर्वी स्थानिक लोकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास रोहित पालचा मृतदेह सापडला.त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.तर सायंकाळी ७ वाजता अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात होती. घटनेचा पुढील तपास पारशिवनी पोलिस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!